पिंपरी: पालेभाज्यांचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत मेथीच्या जुडीसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागले, तर इतर पालेभाज्याही ३० रुपये प्रति जुडीने विकल्या जात होत्या. याउलट, फळभाज्यांचे दर मात्र या आठवड्यात काही प्रमाणात कमी झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मंडईत कांदा, लसूण आणि बटाट्याचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. लसूण १०० रुपये प्रति किलो होता, तर कांदा आणि बटाटा १०० रुपये प्रति ४ किलो या दराने उपलब्ध होते. टोमॅटो २५ रुपये प्रति किलो तर आले ८० रुपये प्रति किलो विकले जात होते.

बाजारात गवार १०० रुपये, शेवगा १०० रुपये, भेंडी ५० रुपये, फ्लॉवर ४० रुपये, शिमला मिरची ८० रुपये, वांगी ४० रुपये, काकडी ५० रुपये, कारले ८० रुपये, कोबी ४० रुपये, मिरची ५० रुपये, गाजर ६० रुपये, बिन्स १००-१२० रुपये, घेवडा १८० रुपये, रताळी ६० रुपये, लाल भोपळा ८० रुपये, लिंबू १५० रुपये, दोडका १२० रुपये, तोंडली ८० रुपये, आवळा ८० रुपये, बीट ४० रुपये, दुधी ५० रुपये आणि वाटाणा १४० रुपये असे दर होते.
कोथिंबीर २५-३० रुपये, मेथी ४०-५० रुपये, पालक ३० रुपये, शेपू ३० रुपये, पुदिना १५ रुपये, मुळा ३० रुपये, चवळई ३० रुपये, लाल माठ ३० रुपये, कांदापात ३० रुपये आणि करडई २० रुपये या दराने उपलब्ध होती.

घाऊक जुडी दरांमध्ये कोथिंबीर २० रुपये, मेथी २५ रुपये, पालक १८ रुपये, शेपू १८ रुपये, कांदापात १५ रुपये आणि पुदिना १० रुपये असे दर होते. एकूण आवक पाहता, पिंपरीतील किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे दर चढे होते.







