पिंपरी : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने रविवारी (ता. २६) संविधान दिन साजरा करण्यात आला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे यांची उपस्थिती होती. या वेळी ‘संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद शूरवीरांना आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
त्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. सुनील कडुसकर, ॲड. नारायण रसाळ, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप, ॲड. अजित शिनगारे, माजी सचिव ॲड. निखिल बोडके, सभासद ॲड. नारायण थोरात, ॲड. राज जाधव, ॲड. वाकळे, ॲड. मानसी उदासी, ॲड. सारिका भोसले, ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. विवेक राऊत, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. अजिंक्य लोमटे आणि अनेक वकील बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. दशरथ बावकर, ॲड. फारुख शेख आणि ॲड. स्वाती गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी केले. सहसचिव ॲड. उमेश खंदारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुदायिक वाचन करून झाली.