Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळांमधील अत्यावश्यक कामकाज लवकर पूर्ण करा..: अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या सूचना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 July 2024, 20:48

पिंपरी : महापालिकेच्या १२८ पैकी ११५ शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने सुरक्षा लेखापरिक्षण केले आहे. या लेखापरिक्षणाचे विश्लेषण करून उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करून योग्य उपाययोजना करा. तसेच त्यातील स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, अग्निशमन, माहिती व तंत्रज्ञान आदी विषयक अत्यावश्यक कामकाज लवकर पूर्ण करा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेच्या वतीने सर्व महापालिका शाळांमध्ये दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत सर्व महापालिका शाळांमध्ये सुरक्षा लेखापरिक्षण तसेच बाल सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या लेखापरिक्षणाचे तसेच बाल सुरक्षा कार्यक्रमाचे विश्लेषण करून त्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी संबंधितांना सूचना देताना ते बोलत होते. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी संबंधित विभागप्रमुख तसेच अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. त्यामध्ये शाळांमधील बंद सीसीटीव्ही दुरूस्त करावेत तसेच ब्लाईंड स्पॉट्स ओळखून तेथे सीसीटीव्ही बसवावेत, वैद्यकीय शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये विविध रोगांबाबत जनजागृती करावी, शाळेच्या आवारात अग्निशमन, वैद्यकीय आदी संदर्भातील आपत्कालीन संपर्क क्रमांक असलेला फलक बसविण्यात यावा, ज्या शाळांमध्ये वैद्यकीय प्रथमोपचार पेट्या उपलब्ध नसतील त्यांना उपलब्ध करून द्या, शाळांमधील फुटलेले विद्युत स्विच बोर्ड बदलण्यात यावेत, फायर सेफ्टी ऑडिट प्रमाणपत्र तपासणी करावी, शाळांमधील सायबर सुरक्षा संदर्भातील समस्या दूर कराव्यात, स्थापत्य विषयक अत्यावश्यक कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत आदी सूचनांचा समावेश होता.

दरम्यान, दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याअंतर्गत करण्यात आलेल्या महापालिका शाळांच्या सुरक्षा लेखापरिक्षणात भौतिक सुरक्षा, अग्नि सुरक्षा, भूकंप आणि आपत्ति व्यवस्थापन सुरक्षा, विद्युत सुरक्षा, बांधकामांच्या धोक्यापासून सुरक्षा, क्रीडांगण आणि क्रीडाविषयक सुरक्षा, प्रयोगशाळा आणि त्यातील अपघात सुरक्षा, परिवहन व्यवस्थापन, सामाजिक, भावनिक आणि वैयक्तिक सुरक्षा, आघात व्यवस्थापन, दिव्यांग विद्यार्थी सुरक्षा, आरोग्य विषयक सुरक्षा, मध्यानह भोजन, स्वच्छता, बाल लैंगिक अत्याचाराविरुद्ध सुरक्षा, सायबर सुरक्षा अशा विविध विषयांचे लेखापरिक्षण करण्यात आले आहे. या सर्व विषयांना अनुसरून शाळा मुख्यध्यापकांना प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीच्या उत्तरांच्या आधारे कृती आराखडा तयार करून योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post
Student registration from 13 January for RTE admission

मोठी बातमी! आरटीई प्रवेशासाठी ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp