( Politics News ) पुणे : भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही कसबा ( Kasba ) पोट निवडणुकीत चांगलाच पराभव स्विकारावा लागल्याने शहरात खांदेपालट करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तब्बल 28 वर्षापासून अभेद्य असणारा भाजपचा गड महाविकास आघाडीचे उमेवादर आणि नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये पराभवाचे चिंतन करण्यात येत आहे. यातूनच भाजपचे शहराध्यक्ष ( Bjp)बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.
पुणे शहर भाजप अध्यक्ष पदासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्या नावाची चर्चा आहे.सध्या जगदीश मुळीक यांच्याकडे पुणे भाजपची शहराध्यक्षपदाची धुरा आहे.कसबा मतदारसंघातून ब्राम्हण समाजाला उमेदवारीनी दिली नसल्याने समाज नाराज असल्याचे समोर आले होते.
मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याची मागणी असतानाही कुटुंबाबाहेर तिकीट दिल्याचा फटका बसल्याची चर्चा आहे. तर कसबा पेठेतील पारंपरिक ब्राह्मण मतदारांनीही आधीपासूनच पाट्या-बॅनरमधून व्यक्त केलेला रोष मतांमधून अधोरेखित केला. त्यामुळे भाजपचा पराभव झाल्याचेही बोलले जात आहे .
कसबा (Kasba) विधानसभा पोटनिवडणुकीतील ( election )पराभवानंतर पुणे शहर भाजप कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या महिना अखेरीस मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. पुणे शहर भाजपाध्यक्ष बदलण्याची ही शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बदल होण्याचे सुतोवाच वर्तवले आहेत.
त्यामुळे आता पुणे शहर भाजप अध्यक्षपदी ब्राम्हण समाजा चेहरा पुढे आणणार का असाही प्रश्न यानिमत्ताने पुढे आला असून भाजपला आक्रमक चेहऱ्याची आवश्यकता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजप आगामी निवडणुका लक्षात घेवून कोणाच्या खांद्यावर जबाबदारी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
आगामी काळातील निवडणुकी स्वबळावर लढायच्या आणि जिंकायच्याही..! भारतीय जनता पार्टीचा निर्धार..!
भाजपमध्ये मोठे फेरबदल…! विनोद तावडे व पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी
भाजपाच्या सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी जनार्दन दांडगे यांची निवड