पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे यांने कारागृहात आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 31, रा. कोपर्डी, ता. कर्जत) हा या घटनेतील मुख्य आरोपी होता. रविवारी (ता. १०) सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज पहाटे पोलिस गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला.
जितेंद्रचे आई- वडील मजुरी करतात. तोही मजुरी करून पोट भरत होता. तो गावातीलच वीटभट्टीवर काम करीत होता. घटनेच्या अगोदर चार दिवस वीटभट्टीचालकांकडून त्याने उचल घेऊन नवीन दुचाकी खरेदी केली होती.
दरम्यान, याच दुचाकीवरुन फिरताना पीडितेच्या भावाने त्याला घटनास्थळी पाहिले होते आणि पुढे याच धाग्याने तो पकडला गेला. कोपर्डी बलात्कार घटनेचा तो आरोपी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.