-संगीता कांबळे
पिंपरी – चिंचवड : राज्यभरासह पुणे जिल्ह्यातही तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक भागात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पिंपरी – चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी गेलेली रुग्णवाहिका पावसाच्या पाण्यात मधोमध अडकली . ही घटना आज (दि.25 जुलै) रोजी सकाळी घडली.
पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठल्याने वायसीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका रस्त्यात अडकली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने रुग्णवाहिका मध्येच थांबवावी लागली. दरम्यान रुग्णवाहिकेत अडकलेले डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर, रक्तदान शिबिर रद्द करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासन व आपत्कालीन विभागाकडून करण्यात आले आहे.