पिंपरी चिंचवड : Sports News – पिंपरी चिचंवड आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Police inspector Devendra Chavan’s) यांच्या ७ वर्षाच्या चिमुकल्याने (7-year-old child’s bravery) भीमपराक्रम केला आहे. रिआनने ५१ किमी सायकलवर चालवून पुणे दर्शन केले आहे. त्याने सी.एम.ई. खडकी, लाल महाल, शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध निगडी अशी सायकल चालवून विक्रम केला आहे. आणि त्याच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. (Sports News)
पिंपरी-चिंचवड येथील पाच किलोमीटर मॅरेथॉन
रिआनने पिंपरी-चिंचवड येथील पाच किलोमीटर मॅरेथॉन ३४ मिनिटात पूर्ण केलेली आहे. स्पोर्ट्स फोर ऑल २०२२ या अंडर आठ वर्षे वयोगटात ५० मीटर रनिंग मध्ये तीसरा नंबर पटकावून ब्रांच मेडल मिळवलेले आहे. तो केंद्रीय विद्यालय देहूरोड नंबर एक या शाळेत दुसरीत शिकत आहे. रिआनचे वडील देवेंद्र चव्हाण पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक पदावर तर आई डॉ.अपर्णा या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.
दरम्यान, रिआनचा लहानपणापासून साहसी खेळाकडे कल आहे. त्याने वयाच्या तिसऱ्या वर्षी सिंहगड ट्रेक केला. त्यानंतर त्याने तिकोना, विसापुर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, असे किल्ले सर केले आहेत. तसेच तो घराजवळील घोरावडेश्वर, चौराईमाता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाईमाता मंदिर, दुर्गा टेकडी ट्रेक करत असतो.