Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशी दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा! पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट निलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 15 July 2026, 16:06

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. या प्रकरणात पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचे निलंबन करण्यात आले असून दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान त्यांनी कोणताही हस्तक्षेप करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्या उत्तरांचा आढावा घेतल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मोशी येथील कचरा डेपो परिसरात तीन मजली इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंत्राटदार कंपनी ‘अँथोनी लारा रिन्युएबल एनर्जी’च्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून दुसरा उपचार घेत असल्याने त्याच्यावरील पुढील कारवाई प्रलंबित आहे.

महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले की, सध्या कुलकर्णी आणि आल्हाट यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, पोलिसांच्या तपासात त्यांच्या निष्काळजीपणाचा किंवा थेट सहभागाचा पुरावा आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

 

दरम्यान, ‘अँथोनी लारा रिन्युएबल एनर्जी’ कंपनीने नोटिशीला दिलेल्या उत्तरात दुर्घटनास्थळी कोसळलेला कचरा हा बायोमायनिंग करणाऱ्या दुसऱ्या कंपनीचा असल्याचा दावा केला आहे. या दाव्याचीही पडताळणी करण्यात येणार असून संबंधित बायोमायनिंग कंपनीची चौकशी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मोशी दुर्घटनेमागील नेमकी जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासकीय आणि पोलिस तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59

पुण्यात धावत्या बसमध्येच प्रवाशासोबत घडलं भयंकर! क्षणात खाली कोसळला अन् १५ मिनिटांचा थरार….

Monday, 17 August 2026, 16:57

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

Monday, 17 August 2026, 16:52

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

Monday, 17 August 2026, 16:47

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07
Next Post

लालपरीचा प्रवास महागला! 13.50% भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट किती रुपयांनी वाढणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.