पिंपरी चिंचवड : मोशी परिसरात एक घटना घडली आहे. वाढदिवसाला केक आणला नाही म्हणून कानाखाला मारली आहे. त्याचा राग मनात धरुन तरुणावर कोयत्याने वार केले. मोशी येथे रविवारी (ता.20) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी 18 वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता.21) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रोहन रवींद्र नजन (वय-20, रा. मोशी) त्रषीकेश नागनाथ तेलंग (वय-19, रा. मोशी) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
या घडनेसंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचा केक आणला नाही म्हणून फिर्यादी तरुणीच्या भावाने रोहनच्या कानाखाली मारली. याचा राग मनात धरुन त्याने त्याचे साथीदार सोबत घेत फिर्यादी तरुणीचा भाऊ व त्याचा मित्र यांना मारहाण केली.
थांब आता तुला जिवंत सोडत नाही, तुला संपवूनच टाकतो, असे म्हणत कोयता डोक्यात मारुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.