Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पहाटे थरार! व्यापाऱ्याची गाडी फोडली, गळ्याला कोयता लावत धमकी दिली अन् घडलं भयंकर….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 12 August 2026, 14:56

पिंपरी-चिंचवड : शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच थेरगाव परिसरात पहाटेच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयाबाहेर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याच्या गळ्याला कोयता लावून त्याच्याकडील दीड हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. सोमवारी (१० ऑगस्ट) पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

वैभव आनंदराव नळगिरे (वय २७, रा. थेरगाव) यांनी आपली कार परिसरातील एका रुग्णालयाजवळ पार्क केली होती. पहाटेच्या वेळी काही जण पेव्हर ब्लॉक, विटा आणि कोयत्याच्या साहाय्याने त्यांच्या कारच्या काचा फोडत होते. कार फोडल्याचा आवाज ऐकून वैभव नळगिरे घटनास्थळी गेले. त्यांनी टोळक्याला कारचे नुकसान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

मात्र, विरोध केल्याने आरोपी आक्रमक झाले. नीरज हकीम सोळंके (वय २१) याने हातातील धारदार कोयता थेट वैभव यांच्या गळ्याला लावला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी त्याचा साथीदार सूरज हकीम सोळंके (वय १९) याने वैभव यांच्या खिशातून जबरदस्तीने दीड हजार रुपयांची रोकड काढून घेतली.

रोकड लुटल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे घाबरलेल्या वैभव यांनी तत्काळ वाकड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार नीरज सोळंके आणि सूरज सोळंके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कारच्या काचा फोडण्यापासून सुरुवात झालेला हा प्रकार थेट कोयत्याच्या धाकावर लुटीपर्यंत पोहोचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37

बायको रक्ताच्या थारोळ्यात पडून ओरडत राहिली अन् तो पसार झाला! चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात नवरा-बायकोचा तुफान राडा

Thursday, 13 August 2026, 16:13
Next Post

'धर्म बदल तरच लग्न करेल' पुण्यातील मोहम्मदने अल्पवयीन मुलीला पंजाबमधून पळवलं; शरीरसंबंध ठेवत धर्मांतर करण्यासाठी दबाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.