पिंपरी-चिंचवड : पुण्यातुन चोरीची एक घटना समोर आली आहे. कमी वेळेत पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चशिक्षित तरुणाने आपल्या सारख्याच तरुणांना एकत्र घेऊन तब्बल ५३ दुचाकी चोरल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज सावंत असं दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याचं नाव आहे. धीरजने बी ई मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलं आहे. त्याच्या सोबत असणारेही उच्च शिक्षित आहेत. विशेष म्हणजे शिक्षणासाठी लागणारा लाखोंचा खर्च आणि इतर शौक पूर्ण करण्यासाठी या तरुणांनी चोरीचा मार्ग निवडल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले आहे. टोळक्याने शहरात टोळी तयार करून 53 दुचाकींची चोरी केली आहे.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कारवाई करत सर्व दुचाकी जप्त केल्या आहेत.