पिंपरी चिंचवड : आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आयटी अभियंत्यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ज्यादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. यास साधारण ७१ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी परदेशातील संशयित आरोपीस अटक केली आहे. गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक केली जात असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात जादा नफा देण्याचे आमिष दिले जात आहे. याला अनेकजण बळी पडत असतात. अशाच प्रकारे आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याची देखील फसवणूक झाल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघड आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयटी अभियंता यास संशयित आरोपीने संपर्क करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. यातून जादा नफा देण्याचे आमिष देण्यात आले होते. यावर विश्वास ठेवून पैशांची गुंतवणूक करण्यास सुरवात केली. यात साधारण अभियंता तरुणाची ७१ लाख ५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत संबंधिताने पिंपरी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दोन जण घेतले ताब्यात..
दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी तपास करत फसवणूक करणाऱ्या रशियन देशातील लिंलिनस्काय या परिसरातील असलेल्या 30 वर्षीय संशयित आरोपी अंनटोली मिनरोव्ह याला गोव्यातून तर त्याचा पुण्यातील साथीदार श्रेयश माने याला देखील पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत आहेत.