पिंपरी : खेळायला जातो असे सांगून बाहेर पडलेल्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने त्याचा खून केल्याची घटना पिंपरी येथील मासुळकर कॉलनी येथे शुक्रवारी (ता. १०) घडली आहे. तर मुलाच्या वडिलांकडे २० कोटी रुपयांची मागणी केल्याची महितीहि समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार पैश्यांसाठी की आणखी कश्यासाठी झाला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
आदित्य गजानन ओगले (वय-०७, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (वय ४९, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी आदित्यचे अपहरण झाल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. खेळायला जातो असे सांगून आदित्य हा गुरुवारी सायंकाळी घरातून बाहेर पडून इमारतीच्या खाली आला होता. त्यानंतर तो दिसून न आल्याने त्याच्या आई वडिलांनी शोध सुरू केला. मात्र शोध लागला नाही. गजानन ओगले यांना एक फोन आला आणि त्याने २० कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या पथकाच्या सहायाने तपास केला.
दरम्यान, आदित्य याच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका संशयित तरुणाकडे कसून चौकशी केली. त्यावेळी आदित्य याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आदित्य याचा मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर मिळून आला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.