देहूगाव, (पुणे) : देहूगाव येथील काळोखे मळ्यातील विजेच्या शॉर्टसर्किटमुळे सुमारे १२ एकर ऊस जळून खाख झाल्याची घटना घडली. यामध्ये ९ शेतकऱ्यांचे सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर काही आंब्याची आणि नारळाच्या झाडासंह कादा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवार २६ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, संरक्षण विभागाच्या डेपोपासुन अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर ही आग लागली होती. संरक्षण विभागाच्या डीएडी डेपोच्या संरक्षक कुंपनाच्या आतील बाजुला दोन अगीचे बंब आणि लष्कराचे जवान सज्ज होते. अग्निशमन जवानांन ही आग विझवण्यात यश आलं. मात्र, रामदास तुकाराम काळोखे, सचिन बाळासाहेब काळोखे, अभिजित सुदाम काळोखे, महेश मधुकर काळोखे, बबन लक्ष्मण काळोखे, खंडू सखाराम काळोखे, गणेश तुकाराम काळोखे, बाजीराव गोविंद काळोखे, गोपाळ गेणूजी काळोखे या नऊ शेतकऱ्यांचे आगीमुळे नुकसान झाले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग येवढी भयंकर होती की सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावरुनही दिसत होती. आगीच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात उसळत होत्या. त्यामुळे आग विझविण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. तातडीने देहू नगरपंचायतीच्या अग्नीशमन विभागाला या घटनेची माहिती दिली.
अग्नीशमन दलाच्या ४ कर्मचाऱ्यानी एका बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. या आगीत शंतकऱ्यांच्या बांधावरील आंब्याची ७ ते ८ झाडे आणि नारळाची झाडे जळाली आहेत. याशिवाय शेजारी शेतात असलेल्या कांदा पिकाला आगीची झळ बसली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं फटका बसला आहे.