पुणे : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात २१६ पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीला आज म्हणजेच सोमवार (ता.३०) पासून सुरुवात झाली आहे.
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन, वानवडी, हडपसर पुणे येथे ही मैदानी प्रक्रिया ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.
तसेच, शहर पोलीस भरतीचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये २१६ पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भरती झालेले उमेदवार नुकतेच कर्तव्यावर रुजू झाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील भरतीनंतर आयुक्तालयाला आणखी २१६ एवढे मनुष्यबळ मिळेल. सन २१९ च्या पोलीस भरतीत झालेले गैरप्रकार यावेळी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांचे आवाहन…
पोलीस भरती करून देतो, असे आमिष जर कोणी दाखवत असेल , तर त्यास उमेदवारांनी बळी पडू नये. असे प्रकार निदर्शनास आल्यास दक्षता अधिकारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (9529691966), पोलीस सह आयुक्त मनोज लोहिया (7977890897) यांच्याशी संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.