( Pimpari crime ) पिंपरी-चिंचवड : पादचारी तरुणाला पुलावरून ढकलून देईन म्हणत धमकी देत दोघांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथून समोर आला आहे. हा प्रकार शहरातील जुना पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी (Pimpari) येथे मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री घडला. शहरात लुटमारीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी प्रवीण मनोज शिरसाठ (वय 23, रा. रांजणगाव एमआयडीसी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका कंपनीत काम करतात. ते मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या बस मधून जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे उतरले. तिथून ते बीआरटी रोड ओलांडून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी फिर्यादी यांना अडवले. आम्हाला पैसे दे नाहीतर तुला मारीन. तुला पुलावरून फेकून देईन, अशी धमकी दिली.
रोख रक्कम, मोबाईल फोन, ऑनलाईन पैसे आणि स्मार्ट वॉच चोरून चोरटे फरार…
फिर्यादी यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले असता चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशात जबरदस्तीने जात घालून 21 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीला एका फोन पे नंबरवर 1 हजार 400 रुपये पाठवण्यास सांगितले. रोख रक्कम, मोबाईल फोन, ऑनलाईन पैसे आणि स्मार्ट वॉच घेऊन चोरटे पळून गेले.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…