पुणे : पुण्यात आज सकाळी पहाटे मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा अपघात झाला आहे. पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा रस्त्यावरून एक पादचारी जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानोबा ढबळे असं जखमी व्यक्तीचे नाव आहे.
आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती पहाटेच्यावेळी भरधाव वेगात वाहन येत असताना देखील रस्ता ओलांडत आहे. या अपघाताची घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नेमक काय घडलं?
पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा रस्त्यावरील ही घटना आहे. रस्त्यावरून एक पादचारी रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची त्याला जोरदार धडक बसली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही देखील पाहू शकता की, हा व्यक्ती पहाटेच्यावेळी भरधाव वेगात वाहने येत असताना देखील रस्ता ओलांडत आहे. रस्ता ओलांडत असताना सुरुवातीला एक चारचाकी वाहन समोरून येत आहे. त्यातून कसाबसा हा व्यक्ती पुढे निघून जातो. तितक्यात समोरून एक दुचाकी भरधाव वेगात येत असते.
अचानक समोर हा व्यक्ती आल्याने दुचाकीस्वराला ब्रेक मारून गाडी थांबवण कठीण होतं. दुचाकी वेगात असताना देखील आपण धावत रस्ता क्रॉस करू शकतो असं या व्यक्तीला वाटतं. मात्र दुचाकी आणि त्याची जोरदार धडक होते. दुचाकी वेगात असल्याने हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला उडून पडतो. त्यासोबत दुचाकीवरील अन्य दोन व्यक्ती देखील खाली पडतात. या घटनेत पादचारी गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
View this post on Instagram