पुणे : पुण्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काही दिवासापुर्वीच कुख्यात गुंड गजा मारणे याच्या घरी भेट दिली होती. या भेटीन राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. अशातच आत्ता पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
असिफ दाढी याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच शस्त्रांसह त्याला पोलीसांनी अटकही केली होती. अजित पवार यांची भेट त्याने का घेतली याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. असिफ दाढीने गुरुवारी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. असिफ दाढीला राजकारणात येण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी एका कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी तो गेला असल्याची माहिती आहे. तृतिय पंथियांसाठी काम करणाऱ्या एक संस्थेसाठी तो काम करतो अशीही माहिती समोर येत आहे.
आसिफ दाढीची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय?
आसिफ शेख उर्फ दाढी याच्यावर पहिला गुन्हा १९८८ साली दाखल झाला होता. पहिला गुन्हा हा मारहाणीचा होता. पण, मारहाण करत त्याने गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं. अगदी २०२१ पर्यंत त्याच्यावर ८ गुन्हे दाखल झाले आहेत. १९८८ मध्ये मारहाण करणे, १९९६ आणि २००४ साली संगनमत करून खुनाचा प्रयत्न करणे, २००७ मध्ये अपहरण करून हत्या केली, २००९ आणि २०११ साली शस्त्राचा वापर करणे, विनापरवाना शस्त्र बाळगून कट रचने आणि २०२१ साली अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी देणे. अशा गुन्ह्याचा यात समावेश आहे. २०११ साली पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने असिफ दाढीला त्याच्या घरातून पिस्तुलासह अटक केली होती.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने घेतली खा. श्रीकांत शिंदे यांची भेट
कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची बातमी समोर येऊन काही तास उलटत नाही, तोच आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे.