पुणे : गेल्या आठवड्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सर्वसामान्य जनतेसाठी हे मंदिर खुले करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी राम भक्तांकडून केली जात होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला. ३० जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आता या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता असून, पुण्यातील भविकांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. अयोध्येतील गर्दीमुळे या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुणेकरांचा हिरमोड झाला आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर लाखो भाविकांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेण्यास सुरूवात केली. अयोध्येला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी राम भक्तांकडून केली जात होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला. ३० जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी १५ विशेष गाड्या सोडल्या जाणार होत्या. एका गाडीमधून साधारण दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकतील, अशी सोय होती. मात्र, अयोध्येमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लाखो भाविक रोज राम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. गर्दीमुळेच या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन या गाड्या सोडणार आहे. मात्र, या एकट्या प्रवाशाला तिकीट आरक्षित करता येणार नाही. प्रवाशांचा समूह असेल तरच तिकिट आरक्षित करता येईल. यासाठी किमान १५ प्रवाशांचा समूह असणे आवश्यक आहे.
दरम्यान, अयोध्येतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक काही दिवस पुढे ढकलण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. म्हणूनच पुण्यातील भक्तांना अयोध्येला जाण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. पण यामुळे पुण्यातील भक्तांचा हिरमोड झाला असेल हे नक्की. या गाड्या आता नेमक्या कधी सुटतील याबद्दल स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही.