Pension | पुणे : रक्षा लेखा महानियंत्रक यांच्या मार्फत प्रधान रक्षा लेखा नियंत्रण- निवृत्तीवेतन, (पी.सी.डी.ए-पेन्शन) प्रयागराज यांचे पथक निवृत्तीवेतनविषयक ‘स्पर्श’ प्रणालीबाबत माहिती देण्यासाठी व अडी अडचणी सोडविण्यासाठी २४ ते २६ मार्च या कालावधीत पुणे येथे उपस्थित राहणार आहे.
हे पथक २४ ते २६ मार्चदरम्यान सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत वेटरन नोड, हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया समोर, घोरपडी, पुणे येथे उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Old Pension Scheme | राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने खडाजंगी
Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग