Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PCMC News: बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा आता होणार‘‘बंदोबस्त’’

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 November 2025, 18:58
PCMC News: Bangladeshis residing illegally will now be “settled”

पिंपरी-चिंचवड : चिखली–कुदळवाडी परिसरातील (PCMC News) बेकायदेशीर भंगार दुकाने, अनधिकृत बांधकामे आणि बांगलादेशी नागरिकांच्या हालचालींवर (Pune Crime) राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन आणखी कठोर भूमिकेत आले असून, सर्व यंत्रणांना ‘नो-टॉलरन्स’ मोडमध्ये कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. गृह (शहरे) विभागाने कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करण्याची सक्त सूचना दिली आहे, तर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही बांगलादेशी नागरिक आढळून आल्यामुळे पुढील तपास व अटक कारवाया आणखी कठोर होणार आहे. (Breaking News)

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी 2025 मध्ये चिखली–कुदळवाडीत मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून हजारो अनधिकृत झोपड्या, पत्राशेड, बांधकामे, भंगार अड्डे आणि अवैध कारखान्यांना जमीनदोस्त केले होते. ही कारवाई इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखणे, परिसराचा नियोजित विकास अंमलात आणणे आणि परिसरात वावरणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांच्या बिमोडासाठी केली होती. या कारवाईनंतरही काही अनधिकृत भंगार दुकानांनी पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे.

वास्तविक, बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर गृहविभागाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अहवाल मागवला होता. बेकायदेशीर भंगार दुकाने आणि बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली आहे. या पुढील काळातही कारवाई करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निर्देश दिले आहेत.

बांगलादेशी घुसखोरांचा पर्दाफाश….

चिखली पोलिसांच्या कारवाईत 27 मार्च 2025 रोजी तळवडे येथे दोन महिला आणि एक किशोरवयीन मुलगा बांगलादेशी असल्याचे उघड झाले. त्यांचा टुरिस्ट व्हिसा 2022 मध्येच संपला होता, तरीही ते भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. तपासात मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख याने त्यांचे पासपोर्ट जाळून पुरावे नष्ट केल्याचे, तसेच आधार, पॅन आणि मतदान ओळखपत्रे बनवून ‘भारतीय’ ओळख तयार केल्याचे समोर आले. या प्रकरणात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

गृहविभागाचे आदेश…

शासनाने 27 जून 2025 रोजी विशेष परिपत्रक काढून चिखली–कुदळवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि भंगार व्यवसायांवर समन्वित मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार, परिसरात बांगलादेशी नागरिक आढळल्याने अटक, तपास, सत्यापन व दस्तऐवज छाननीची कारवाई सतत आणि तीव्र पद्धतीने केली जाणार आहे. महापालिका, पोलिस आणि महसूल विभाग संयुक्त मोहीम राबविणार आहेत.

“कुदळवाडी–चिखली परिसरात बेकायदेशीर भंगार दुकाने, अनधिकृत अतिक्रमणे आणि घुसखोरी करणारे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. फेब्रुवारीतील अतिक्रमण कारवाईसारखीच आणखी व्यापक मोहीम सुरू राहील. राष्ट्र सुरक्षा, नदी प्रदूषण प्रतिबंध आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना सुरक्षित परिसर आणि नियोजित विकास हेच आमचे प्राधान्य आहे.”
– महेश लांडगे, (आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Next Post

विमानाचं टेक ऑफ, आगीचा डोंब अन् क्षणार्धात जमिनीवर... काय घडलं? पहा थरारक Video...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.