लोणी काळभोर, (पुणे) : उरुळी ते यवत या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान विविध कामासाठी रेल्वे प्रशासनाने रुळाच्या मध्यभागी सिमेंट टाकलेले आहे. या रुळावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये सिमेंटचे धुलीकण उडून प्रवाशांच्या नाकातोंडात जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (ता.31) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.
पुणे-सोलापूर हा दुहेरी लोहमार्ग आहे. या मध्य रेल्वेच्या उरुळी ते यवत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने दोन्ही रुळाच्या मध्यभागी सिमेंट टाकलेले आहे. या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यात या सिमेंटचे धुलीकण जात आहेत. हे धुलीकण नाकातोंडात गेल्यामुळे काही प्रवाशांना खोकल्याचा त्रास होत आहे. तर काही प्रवाशांच्या डोळ्यात धुलीकण गेल्यामुळे जळजळ होत आहे.
सुखकर व आनंदायी प्रवास व्हावा. म्हणून अनेक नागरिक रेल्वे प्रवासाला प्रसंती दर्शवितात. त्यासाठी काही नागरिक आगोदरच पैसे भरून तिकीटे विकत घेतात. तर दैनंदिनी प्रवास करणारे मासिक पास काढतात. त्या व्यतिरिक्त अनेक प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवासामध्ये काही आजारी रुग्ण, लहान मुले व जेष्ठ नागरिकयांचा समावेश असतो.
दरम्यान, उरुळी ते यवत या रेल्वे प्रवासदरम्यान सिमेंटचे धुलीकण नाकातोंडात जाऊन एखादी मोठी दुर्घटना घडली तर, याला जबाबदार कोण असा सवाल रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला आहे. या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
दुपारच्या पुणे-दौंड शटलमध्ये प्रवास करत होतो. यावेळी अचानक सिमेंटचे धुलीकण डब्यांमध्ये घुसले. त्यामुळे लोकांमध्ये खूप गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. या धुलीकणाचा त्रास काही प्रवाशांना होत होता. तर काहींना श्वास घेण्याचा त्रास झाला. एखादी मोठी दुर्घटना घडण्यागोदारच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या आरोग्याच्या दृस्तीकोनातून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करावी.
अनिल शिंदे (अध्यक्ष – रेल्वे प्रवासी संघटना, लोणी काळभोर)