मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालय मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पंडित प्रल्हाद कांबळे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ‘राज्यप्रमुख’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. जयदेवराव गायकवाड, माजी आमदार आणि कोषाध्यक्ष मा. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस मा. रवींद्र पवार, लक्षण कांबळे, सचिन तावरे, शशिकांत तापकीर, संजय गायकवाड, रविभाऊ खिलारे, हूजूर इमानदार तसेच जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.