Pachgani News : पाचगणी, ता.९ : पर्यटन नगरी पाचगणी शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होत असलेला कला, सांस्कृतिक कलागुणांनी नटलेला ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिवल’ डिसेंबर २०२३ मध्ये आयोजित करण्याचे पाचगणी करांचे नियोजन आहे. या निमित्ताने केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांना आय लव्ह पाचगणी फेस्टिवलचे संस्थापक भारत पुरोहित यांनी प्रत्येक्ष भेटून निमंत्रण दिले.
कामगिरी लक्षवेधक
यावेळी बोलताना मंत्री नाईक म्हणाले, काही वैद्यकीय कारणांमुळे मी गतवर्षीच्या फेस्टिव्हला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र पाचगणी शहर स्वच्छ भारत अभियानात बजावत असलेली कामगिरी लक्षवेधक आहे. त्यामुळे आपण यावर्षीच्या फेस्टिव्हला निश्चित उपस्थित राहू असा शब्द मंत्री नाईक यांनी दिला.
पाचगणी शहरातील पर्यटन विकास व नागरी सुविधा यासाठी संबंधित महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळाच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत करण्याच्या सूचना नाईक यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे पाचगणीतील लोकसहभागाला केंद्र शासनाची व राज्य शासनाची मदत मिळेल असे भारत पुरोहित यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ ला माहिती दिली आहे.