लोणी काळभोर : पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एक घटना घडली अन् अक्खा देश हादरला… कोलकाता मधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी (PGT) डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची निर्दयी घटना घडली आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्रातही या घटनेचा निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. तर डॉक्टरांनीही संप पुकारला आहे. या घटनेचा निषेध करीत पिडीतेला न्याय मिळावा. यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलने बाह्यरुग्ण विभाग आज शनिवारी (ता. १७) एकदिवस बंद केला होता.