लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या वतीने सभासदांसाठी मुंबईत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून पुढील महिन्यात राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र (बापूसाहेब) काळभोर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघ संलग्न पुणे जिल्हा कार्यकारिणी व हवेली तालुका शाखेची डिसेंबर महिन्याची मासिक बैठक थेऊर फाटा, कुंजीरवाडी, (ता. हवेली) येथील हॉटेल S4G येथे रविवारी (ता. 30) दुपारी 1 वाजता खेळीमेळीत पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या सभासदांना माहिती देताना काळभोर बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष प्रशांत चौरे, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू काळभोर, जिल्हा सचिव महेंद्र काळे, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड, बाळासाहेब मुळीक, युनूस तांबोळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जीवन सोनवणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप नवले, संजय सोनवणे, दौंड तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, दौंड तालुका उपाध्यक्ष संदीप भालेराव, दीपक पवार, शिरुर तालुका पदाधिकारी अमीन मुलाणी, खंडाळा तालुका पदाधिकारी गणेश जाधव, खेड तालुका पदाधिकारी मनोहर गोरगल्ले, लहु लांडे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके, हवेली तालुका उपाध्यक्ष अमोल अडागळे, समन्वयक अमोल भोसले, सचिव जितेंद्र आव्हाळे, सुधीर कांबळे, रियाज शेख, शहाजी नगरे, प्रवीण शेंडगे, विशाल कदम, हनुमंत चिकणे, सुखदेव भोरडे, जयदीप जाधव, पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
दरम्यान,या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेची आगामी काळातील ध्येयधोरणे, संघटनेच्या सभासदांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविणे, सभासदांकडून आलेल्या विविध सुचनांचा उहापोह करुन सर्व संमतीने नवीन कार्यक्रम आयोजित करणे, सभासद व पदाधिकारी यांच्या संमतीने उपस्थित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. सर्व सभासदांची मते जाणून घेऊन यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.