Onion Price : पुणे : कांद्याच्या दरात आश्चर्यकारक घसरण झाल्याच पहायला मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 3200 ते 3500 इतका भाव मिळत होता. त्यात क्विंटल मागे 300 ते 800 रुपये घसरण झाली आहे. आता कांद्याला प्रति क्विंटल 2600 ते 3200 इतका भाव मिळत आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. घसरण रोखण्यासाठी उपाय करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कांदा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु याच कांद्याने आता शेतकऱ्यांना रडवायला सुरूवात केली आहे. महिन्याभरात कांदा अर्ध्या किमतीवर आले आहे. नाशिक जिल्ह्याप्रमाणे सोलपूर जिल्ह्यांत कांद्याचे दर घसरले आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. सोलापुरात शनिवारी जवळपास साडेपाचशे गाडी कांद्याची आवक झाली आहे.
काय राहिला कांद्याचा दर
सोलापुरात सध्या चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल 25 ते 30 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात हे दर निम्म्यावर आले आहे. मागील महिन्यात कांद्याला 60 ते 70 रुपये भाव होता. एका आठवड्यात जवळपास 3 हजार गाडी कांद्याची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.