युनूस तांबोळी
शिरूर : रब्बी हंगामातील गहू हरभऱ्यासह सर्व पिके जोमदार आलेले आहेत.या पिकांबरोबर उन्हाळी कांद्याची लागवड अनेक ठिकाणी झाली असून, काही जण अद्यपही कांदा लागवड करीत आहेत. मात्र, मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
शिरूर तालुक्यात कांदा लागवडीने वेग धरला आहे. कांदा रोप बऱ्यापैकी उपलब्ध असला तरी बदलते हवामान, मजूरांची टंचाई यामुळे उत्पादनखर्च कमालीचा वाढला आहे.
कांदा लागवडीठी नांगर, शेत तयार करमे, वाफे पाडणे, खत विकत घेणे या शिवाय फक्त लागवडीला एकरी १० ते १२
हजार रूपये मजूरी, औषधे यांसह मजुरांची ने आण करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वाहतूक खर्च करावा लागतो, तो वेगळाच. एकंदरीत कांदा पीक येईपर्यंत एकरी ४० ते ५० हजार रूपयांपर्यंत खर्च येतो.
या सर्वांचा ताळमेळ बसविणे कांदा उत्पादकांना अडचणिचे ठरत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र ती खोटी ठरली. या वर्षी तरी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांद्यांची लागवड सुरू केली आहे.
टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील शेतकरी इंद्रजीत खामकर म्हणाले कि, कांदा लागवडीसाठी एकरी १० ते १२ हजार तसेच मजूरी, मशागत , रोपे, खते फवारणी, पीक काढणी याचा खर्च पहाता एकरी पन्नास हजार रूपये मोजावे लागतात. भावात त्या मानाने वाढ होतच नाही. यंदा मात्र अपेक्षीत भाव व्हावी. हीच अपेक्षा