लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्ग व सासवड रस्त्याकडे जाणारी उड्डाणपुलावरील वाहतूक शुक्रवारी (ता. १०) रात्री १२ ते रविवारी (ता. १२) रात्री १२ या तीन दिवसात बंद करण्यात आली आहे.
या कालावधीत उड्डाणपुलावरुन सोलापूरकडून पुणेकडे व सासवड कडुन पुणेकडे येणारी वाहतूक सुरु राहील. फक्त अग्निशमन, पोलीस व ॲम्ब्युलन्सला यावरुन जाता येईल. पर्यायी मार्ग हडपसर उड्डाणपुलाचे खालुन पुणे-सोलापूर रोडने इच्छितस्थळी जाता येईल.
सोलापूर महामार्गावर बांधण्यात आलेला हडपसर गांव ते गाडीतळ – जाणारा उड्डाणपुल धोकायदायक झाला असल्याने ५ फेब्रुवारी २०२२ पासून वाहतूकीसाठी संपूर्ण बंद करण्यात आला होता.
पुलावरुन जाणारी संपुर्ण वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली होती. सदर पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून सदरच्या पुलावर ‘लोड टेस्ट’ करण्यासाठी पुलावरुन जाणारी वाहतूक बंद करण्याबाबत पुणे महानगरपालिकेला कळवण्यात आले आहे.