बापू मुळीक
सासवड: जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जेजुरी मोरगाव रोडला पिकअप आणि मोटरसायकलचा अपघात होऊन, एक जनाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सुहास रामदास जगताप (वय 38 वर्ष,व्यवसाय शेती, रा. जवळाअर्जुन चोरवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. विक्रम मोहन जगताप (वय 43 वर्ष, जवळाअर्जून चोरवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे) असे अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे.
जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जेजुरी गावच्या हद्दीत गणेश मंगल कार्यालयाच्या समोरून फिर्यादीचा चुलत भाऊ विक्रम मोहन जगताप (वय 43 वर्ष, जवळाअर्जून चोरवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे) हा त्याची मोटर सायकल ( नंबर एम.एच. 14 आर 96 42 ) वरून जेजुरी-मोरगाव रोडने मोरगावच्या बाजूकडून जेजुरीकडे जात होता.
दरम्यान, अज्ञात चालकाने अज्ञात पिकअप गाडी भरधाव वेगाने, अविचाराने चालवुन त्याच्या समोरील दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना, समोरून मोटरसायकल वरून येणाऱ्या फिर्यादीच्या चुलत भाऊ, विक्रम मोहन जगताप (वय 43 वर्ष , जवळआर्जुन चोरवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे) यांच्या मोटरसायकलला जोरात धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. अशी फिर्याद दिली आहे.
अज्ञात चालकावर भारतीय न्याय संहिता कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपाली पवार करत आहेत.