योगेश मारणे
न्हावरे, ता.३० : न्हावरे(ता.शिरूर)परिसरातील कोकडेवाडी येथील युवकांनी एकत्र येऊन सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून कोकडेवाडी फाटा येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून पाठिंबा दर्शवला.
सोमवारी(दि.३०)सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मराठा युवकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलनाला सुरुवात केली.
दरम्यान न्हावरे येथील पोलीस ठाण्याचे पोलीस व निमोणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोनकर्त्यांची विचारपूस केली.तसेच पोलीसांनी युवकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आवाहन केले.
आंदोलनादरम्यान परिसरातील अनेक नागरिक व मान्यवरांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावली व आपला पाठिंबा दर्शवला.
एक दिवसीय आंदोलनाची सांगता सायंकाळी सहा वाजता झाली.यावेळी युवकांनी एकमेकांना ज्यूस पाजून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सोडले.