पुणे : पुणे महानगर पालिकेकडून महिला सेवकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. यंदा महापालिकेने जागतिक महिला दिनानिमित्ताने एक महत्वाचा निर्णय जाहीर केली आहे.
पुणे महापालिकेने (Pune News)महिला सेविकांना जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्च रोजी ‘हाफ डे’ म्हणजेच अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे महिला सेवक सुखावले आहेत. पालिकेने ही महिलांसाठी एक खास भेट देण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतला आहे.
महापालिकेतील वर्ग एक ते तीन मधील महिला कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी घेता येणार आहे. दिवसभराच्या कामाच्या वेळातून दुपारी महिला सेवकांना दुपारी तीन नंतर कामातून सु्ट्टी घेता येणार आहे. तसेच ज्या महिला सेवक स्वच्छतेसाठी पहाटेपासून कामावर असतात. त्यांना सकाळी साडे दहा नंतरच सुट्टी देण्यात आली असल्याचे असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.