पुणे : आज पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मल्टिसपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाला दोघे उपस्थित असतील. वारजे येथील अतुल नगर भागात हे रुग्णालय उभारले जाणार आहे.
वारजे येथील अतुल नगर भागात ३८० कोटींचे हॉस्पिटल उभे राहत आहे. शरद पवार गटाचे नगरसेवक सचिन दोडके यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील माळवाडीमधील परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम जरी विकासकामांचा असला, तरी या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर लक्ष असणार आहे. या दोघांमधील अबोला कायम राहणार, की दोघे एकमेकांशी संवाद साधणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.