पुणे: येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार शाहरुख सईद खान (वय- 27 रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्याखाली कारवाई केली आहे.
शाहरुख खान हा येरवडा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने लोणीकंद व येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवत असून आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, यासारख्या हत्यारांसह दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या तीन वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी शाहरुख खान याला स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त यांनी शाहरुख खान याला एमपीडीए कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कमगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखा पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.