पुणे : दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा व इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या दिव्यांग आणि इतर सर्वसाधारण उमेदवारांना या मेळाव्याद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आणि समर्थन ट्रस्ट फॉर डिसेबल, पुणे लाइव्हलीहूड रिसोर्स सेंटर या सामाजिक संस्थेमार्फत उद्या (ता. २७) सकाळी ९ ते ३ या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील भाजी मार्केट जवळील कन्यादान मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र (फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी), शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे चार फोटो आणि अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्याच्या ठिकाणी समक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व रिक्तपदे दिव्यांग व इतर सर्वसाधारण उमेदवारांमधून भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे. दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा व इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या दिव्यांग आणि इतर सर्वसाधारण उमेदवारांना या मेळाव्याद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://docs.google.com/forms/ d/e/ 1FAIpQLScEHu1xq9wiLx6Ub9tf1TXm 4phjsAJ3HGc39UG3G_ioRaHS9Q/ viewform?usp=pp_url या लिंकद्वारे नोंदणी करावी