बारामती : राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत ओमराजे चोपडे याची पदार्पणातच कांस्य पदकाला गवसणीविदया प्रतिष्ठाण मराठी माध्यमिक शाळेच्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या ओमराजे चोपडे (वय १३ ) याने नांदेड येथे झालेल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलाट राष्ट्रीय चॅम्पीयनशिप २०२३-२४ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.
डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम नांदेड येथे दिनांक १८ व १९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत हरियाणा, जम्मू, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम, केरळ, मध्यप्रदेश इत्यादी २० राज्यातील सुमारे ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तर महाराष्ट्रातील २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पिंच्याक सिलाटचे राष्ट्रीय प्रशिक्षक व योध्दा स्पोर्ट क्लबचे प्रमुख साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील योध्दा स्पोर्ट क्लब विविध शाळांच्या २१ खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. ओमराजे चोपडे याने टँडिग (फाईट ) प्रकारामध्ये कांस्यपदकाची कमाई केली. ओमराजे चोपडे याने डी गटामध्ये ३९ ते ४२ या वजनी गटामध्ये जम्मू काश्मीर मध्यप्रदेश राज्यातील खेळाडूंना कडवी झुंज दिली व कांस्य पदक मिळवले.
इंडियन पिंच्याक सिलाटचे अध्यक्ष किशोर येवले, आंतरराष्ट्रीय पिंच्याक सिलाट प्रशिक्षक व योध्दा स्पोर्ट क्लबचे प्रमुख साहेबराव ओहोळ , तृप्ती बनसोडे यांच्या हस्ते ओमराजे याला कांस्य पदक प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठाण मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच बारामती सुर्यनगरी येथील योद्धा स्पोर्ट क्लबच्या मैदानावर शुक्रवार (दि 23 फेब्रुवारी) रोजी टेक्सटाईल व एनव्हायरमेंटल फोरम बारामतीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती येथील योद्धा स्पोर्ट क्लबच्या सर्व २१ पदकविजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी योद्धा स्पोर्ट क्लबचे प्रमुख साहेबराव ओहोळ तसेच सर्व खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.
बारामती येथील योध्दा स्पोर्ट क्लबचे महाराष्ट्र संघातील पदक विजेते खेळाडू
गोल्ड मेडल : ऋषोकेश जाधव, प्रज्ञा बनसोडे, पुजा कित्तूरे, संयोगीता यादव, समृद्धी भोसले, राजनंदिनी पालवे.
सिल्व्हर मेडल : द्विज कांबळे, विराज यादव, ऋतुराज घुले .
ब्राँझ मेडल : ओमराजे चोपडे, वेदांत गलांडे, स्नेहल झोले, निधी पलंगे, नेहा पलंगे, स्वागत मलगुंडे, स्वप्नील मुळे, उत्कर्ष जठार, तेजश्री मुळीक, आर्या लिमकर, स्वरूप बनसोडे, दयान काळे.