(Old Pension Scheme) पुणे : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सर्वच सरकारी सेवा कोलमडल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यातला एक विभाग म्हणजे आरटीओ कार्यालयातील कामकाजावर संपाचा परिणाम झाला असून काम ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांचे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कच्चा परवाना ही सेवा ऑनलाइन असलयामुळे नागरिकांना घरबसल्या कच्चा परवाना काढता येत आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात होणारी नूतनीकरण, खटला विभागातील कामे, परवान्याचे कामकाज, लायसन्स विभागातील कामे, प्रशासकीय आस्थापना विषयी कामकाज, कॅशची काही कामे, दुय्यम अर्ज, हस्तांतरण, कार्यालयात होणारी काही वाहन नोंदणी, परराज्यातील वाहनांना एनओसी देणे ही कामे सध्या थांबलेली आहेत. संप सुरु असल्याने नागरिकांना आरटीओ कार्यालयात येऊन पुन्हा घरी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन कराव लागत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आरटीओतील संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात ‘द्वार’सभा घेतली. यावेळी सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष जगदीश कांदे, आरटीओ कर्मचारी संघटनेचे महेश घुले, जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव प्रशांत पवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष; उदयनराजे भोसले