(Old Pension Scheme )पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याची गळ घातली होती. मात्र सरकारी कर्मचारी संपावर ठाम राहिले असून आज (मंगळवार) पासून संपा पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपामुळे शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांतील कामकाज खोळंबणार आहे. शहरातील सुमारे 68 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत.
हा संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार….!
दरम्यान, हा संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसह सार्वजनिक बांधकाम व पाटंबधारे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी केला आहे.
शहरात राज्यातील अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यातही दस्तनोंदणी, भूमिअभिलेख, समाजकल्याण, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उत्पादन शुल्क, औद्योगिक विभाग, सार्वजनिक पाटबंधारे विभागासह इतर अनेक शासकीय कार्यालये आहेत. कर्मचार्यांच्या संपामुळे कामकाज कोलमडणार आहे. विशेषत: दस्तनोंदणी विभागातील कामकाजावर या संपाचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. अगोदरच मार्च महिना सुरू आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसूल करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics News : काँग्रेस केवळ घोषणा करणार पक्ष उदयनराजे भोसले
Pune News : वाकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!
मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!