Old Pension | मुंबईः तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप Old Pension मागे घेत आहोत. असे संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. तसेच उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी तोडगा निघाला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची निर्णय घेतला आहे. अशी माहिती संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Crime News | पुणे : कबूतरांची चोरीवरून वाद; तरुणांला बेदम मारहाण; लोहगावातील प्रकार