पुणे: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीच्या बोरघाटाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने सलग पाच वाहनांना धडक दिल्याने एक भीषण अपघात झाला. या घटनेत वडील आणि मुलीचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. जखमींपैकी चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेल, खोपोली आणि लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोर घाटात झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मालवाहू ट्रकचा वेग अति असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. भीषण अपघातानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात चार जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या महामार्गावर असाच एक भीषण अपघात घडला होता. या अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. बोर घाटात सध्या मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.