राजेंद्रकुमार शेळके
Ojhar News : ओझर : विघ्नहर विद्यालयातील सन १९८२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा विघ्नहर विद्यालयात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला. जवळजवळ ४२ वर्षांनी सर्व मित्र मैत्रीण परिवार या स्नेह मेळाव्या निमित्त एकत्र जमले होते. एक प्रकारचा वैश्विक आनंद , एक प्रकारचे तेज सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून येत होते. निमित्त होते फक्त स्नेह मेळावा आणि गुरुजनांची भेट. (Classmates met once again after 42 years)
१९८२ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
या कार्यक्रमाची सुरुवात अल्पोपहार व राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रथम गणेश पूजन, सरस्वती पूजन व गुरु पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर सर्वानुमते विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी.बी. कुटे सर यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. (Ojhar News) यानंतर सर्व उपस्थित मान्यवर गुरुजनांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला जुजबी परिचय यावेळी गुरुजनांना दिला.
पोलीस खाते, शैक्षणिक खाते ,पाटबंधारे विभाग ,विघ्नहर सहकारी कारखाना ,आरोग्य विभाग, इंजिनिअरिंग खाते , शेती विभाग इत्यादी सर्वच क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी आपले आपले जीवन यशस्वी केले आहे. (Ojhar News) या स्नेह मेळाव्यासाठी 57 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी हजर होते.
या कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यमान मुख्याध्यापक साबळे सर , क्रीडाशिक्षक राऊत सर ,ड्रॉइंग टीचर सगर सर, शिपाई संदीप भाऊ यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. (Ojhar News) कार्यक्रमाच्या मध्यान मृत शिक्षक व मृत मित्रांना यावेळी विशेष आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवर गुरुजनांमध्ये कुटे सर ,घोरपडे सर ,चव्हाण सर ,शिंदे मॅडम , ए.बी.डुंबरे सर ,कुटे मॅडम , नाईक शिपाई घेगडे मास्तर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन करून पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी विद्यार्थी व ओझर गावचे माजी सरपंच सिव्हिल इंजिनिअर किसन जाधव , सोपान कवडे , निर्मला मांडे , लक्ष्मण औटी, कविता जगदाळे, शिवाजी रवळे ,वरिष्ठ पो.निरीक्षक चंद्रशेखर नलावडे , पी. आय.राजेंद्र कवडे , शिक्षणाधिकारी रवींद्र जगदाळे , प्राथमिक शिक्षिका कमल भोर दांगट तसेच सर्वच मित्र परिवाराने विशेष असे परिश्रम घेतले. (Ojhar News) या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.किसन जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षणाधिकारी रवींद्र जगदाळे व आभार प्रदर्शन वरिष्ठ पो. नि.चंद्रशेखर नलावडे,व पी.आय. राजेंद्र कवडे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता गोड सुग्रास अशा जेवणाने झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात काही भागात पावसाला सुरुवात ; उकाड्यापासून मिळाला दिलासा
Pune News : पुणे स्टेशन पसिरातून 16 लाख रुपये किंमतीचा तब्बल 81 किलो गांजा जप्त
Pune News | पुण्यातील महर्षीनगरात डोळ्यात मिर्ची पुड टाकून एकावर कोयत्याने वार