राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल यवत ग्रामपंचायत सदस्य व यवत ग्रामस्थांच्या वतीने सारिका भुजबळ व भरत भुजबळ यांचा निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके यांना देण्यात आले आहे.
दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल व कुल कुटुंबीय यांच्या विरोधात सारिका भुजबळ व भरत भुजबळ या दोघांनी सोशल मिडियावर अश्लिल भाषेत संदेश पाठवला. “सुंदर आपला दौंड तालुका” या व्हाट्सअॅप ग्रुपवर मंगळवारी (ता. २०) सारिका भुजबळ या महिलेने राहुल कुल व कुल कुटूंबावर अत्यंत एकेरी भाषेत व शिवराळ भाषेत पोस्ट करून, अपमानस्पद शब्द वापरले. या संदेशामध्ये वापरलेली भाषा कुल कुटुंबियांची बदनामी करणारी होती. यामुळे तालुक्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या.
सारिका भुजबळ ही महिला एका संघटनेच्या नावाखाली वारंवार लोकांना धमकवणे, अर्वाच्च्य भाषेत बोलणे, असे प्रकार सातत्याने करत आहे. आमदार कुल यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबाबत यवत ग्रामस्थांच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. भुजबळ या महिलेवर कार्यवाही न केल्यास संपूर्ण तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या महिलेवर अथवा ती पोस्ट करण्यामागे जी कोणी संबंधित व्यक्ती असेल तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब लाटकर, उपसरपंच सुभाष यादव, ग्रामपंचायत सदस्या मनीषा रायकर, मनीषा खुटाळे यांनी आमदार राहुल कुल यांच्याबद्दल केलेल्या पोस्टबाबत निषेध व्यक्त केला. तर बचत गटातील गौरी काळे, स्नेहल बोरावके, सारिका माने यांनी यात्रेनिमित्त महिलांना न विचारता फ्लेक्सवर फोटो लावल्याचे सांगितले व कारवाईची मागणी केली. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी दिले.
या वेळी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश शेळके, सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्या उज्वला शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, नाथदेव दोरगे, गौरव दोरगे याबरोबरच ह.भ.प महादेव महाराज दोरगे, गणेश शेळके, समीर सय्यद, विशाल भोसले, संदीप दोरगे, प्रकाश दोरगे, उमेश दिवेकर, शीतल शेळके, सीमा दिवेकर, शिला दोरगे यांसह आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.