पुणे : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजप २३ जागांवरुन थेट ९ जागांवर आला आहे. या सर्व घडामोडीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही कमी पडलो आहे असं म्हणत भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मोठी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्षनेतृत्वाने मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या मागणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शिवसेनेने देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत असं म्हटलं आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही हे मान्य केलं. कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो.
त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यासोबत मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विनोद तावडेंचा विचार करावा
अशातच आता ठाकरे गटाने महत्त्वाचे विधान करत देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पराभव झाल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पराभव स्वीकारला आहे. मला वाटते की भाजपने विनोद तावडे यांचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पराभव झाला आहे, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे.