पुणे : गेल्या काही दिवसांपासून जन्म मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत, असे असताना आता त्यांना दिलासा देण्यारी बातमी समोर आली आहे. आता पुणे महापालिकेच्या व्हाॅट्सॲप चॅटबॅट प्रणालीचा विस्तार करण्यात येणार असून आता विविध प्रकारची हरकत प्रमाणपत्र, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक यांची माहिती या प्रणालीअंतर्गत नागरिकांना मिळणार आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा व्हाॅट्सॲप क्रमांकावरून दिली जात होती. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.
त्यामध्ये जन्म-मृत्यू दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, विविध विभागांची माहिती, तक्रार नोंदणी या सुविधा व्हॉट्सॲपवरून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे याचा त्रास कमी होणार आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी माहिती दिली आहे. सध्या या प्रणालीची तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळकतकर आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा ८८८८२५१००१ या व्हाॅट्सॲप विशेष क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र आता या क्रमांकावरून अन्य सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे हे फायदेशीर आहे.