सिंहगड रोड (पुणे): पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ३ ने दोन कुख्यात दरोडेखोरांना अटक केली आहे. आरोपी कोयता दाखवून परिसरात दहशत निर्माण करत होते. अनुराग संबाजी दारवटकर (२८) आणि विजय अशोक तारू (२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड सिटी रोडवर गस्त घालतांना शिवशंकर अमृततुल्य हॉटेलमध्ये 2 जणांना धमकावत “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही”, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवत होते. चालक पोलीस अंमलदार संभाजी कोंढावळे व दिनेश झोळे तसेच दीपक सपकाळ यांनी दोघांना धारदार शस्त्रे दाखवून आणि लोकांना धमकावताना पाहिल्यानंतर अटक केली. दरम्यान, पोलीस अंमलदारांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जया सोनटक्के यांच्या ताब्यात दिले.
कॉन्स्टेबल संभाजी कोंढावळे, दिनेश झोले आणि दीपक सपकाळ यांच्या पोलिस पथकाने जलदगतीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने केलेल्या कारवाईबद्दल पोलिस विभागाचे कौतुक करण्यात आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि शहरात शांतता राखण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.