बारामती: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून (शुक्रवार, दि. १२ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.
जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ असून, यंदा जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ मे रोजी बारामतीसाठी, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार विभाग बारामती मतदारसंघासाठी १२ यांची ते १९ एप्रिल या कालावधीत आहे उमेदवारी अर्ज दाखल करता निवड येणार आहेत.
२० एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत आहे. बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, या मतदारसंघाचे करता निवडणूक निर्णय कार्यालय विधानभवन येथील विभागीय आयुक्तालयात आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ओबीसी बहुजन पक्षाकडून महेश भागवत हे निवडणूक रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीने खासदार सुळे यांना पाठिंबा दिला आहे. अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असले, तरी खरी लढत ही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजय यांच्यातच पाहायला मिळणार आहे.
वाढीव मतदार कुणाच्या पथ्यावर?
सन २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात सुमारे दीड लाख मतदार वाढले आहेत. त्यातच बारामती आणि पवार हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून असताना आज पवार घरामधील दोन उमेदवार परस्पर उभे ठाकले आहेत. नणंद आणि भावजय अशी लढत होणार असून, विशेषतः पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर, वाढलेले मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.