बापू मुळीक
सासवड : श्री नवखंडे नाथाचे दर्शन घेऊन पुरंदर तालुक्यातून भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांचा विधानसभा उमेदवारीसाठी सामान्य शेतकरी, जेष्ठ नागरिक, युवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य अशा सर्वसामान्यांनी भाजपच्या वतीने वरिष्ठाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही आत्तापर्यंत गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आयटी पार्क, राष्ट्रीय बाजार,अशा विविध अडचणी असूनही हे पुढारी फक्त मतदान आले की सर्वसामान्य नागरिंकापर्यंत पोहचतात.
मात्र, बाकी वेळेत याकडे कुणी लक्ष देत नाही. अडचणी समजून घेत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रत्येक अडचणीवर मात करून त्याला धीर देऊन, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले आहेत. असं असुनही कधीही गंगाराम जगदाळे या व्यक्तीने प्रसार माध्यमे, लोकांच्यात आत्तापर्यंत सांगितले नाही. परंतु आता ही सर्वसामान्य नागरिकांची मागणीच आहे, की भाजप पुरंदरच्या वतीने गंगाराम जगदाळे यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी वरिष्ठाकडे सह्यांच्याद्वारे करण्यात आली आहे.