पुणे : पाणीपुरवठा यंत्रेणतील दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (१७ ऑक्टोबर) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
गुरुवारी (दि. १७) खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (५०० एम.एल. डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती परिसर, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.), एच. एल. आर. व चतुःश्रृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर येथील विद्युत/पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.