पुणे (Pune): पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जुनी धायरी येथे मुख्य जलवाहिनीतून पाण्याची गळती थांबविण्यात येणार आहे. तसेच पारे कंपनी रोड येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी (दि. २४) पश्चिम पुण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. २५) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात् आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग: पारे कंपनी रोड, गणेश नगर, लिमये नगर, गारमळा, गोसावी वस्ती, बरांगणी मळा, दळवी वाडी, कांबळे वस्ती, मानस परिसर, नाईक आळी, यशवंत विहार बुस्टर वरील संपूर्ण परिसर, लेन नं. १० ते ३४ ए व बी दोन्ही बाजू, रायकर नगर, चव्हाण बाग, त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर इ.