पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्व्ह व मुख्य जलवाहिनीचे तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या (गुरुवार, दि. २३) दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, स.नं. ३, ४, ७,०८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी परिसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे व शुक्रवार, २४ जानेवारी रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग : भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी चौक, जिजामाता भुयारी मार्ग परिसर, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, स.नं. ३,४,७,८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी इ. संपूर्ण परिसर.